37.1 C
Gondiā
Thursday, June 4, 2026
Home विदर्भ बाम्हणीत 33 लोकांना विषबाधा,रुग्णालयात दाखल

बाम्हणीत 33 लोकांना विषबाधा,रुग्णालयात दाखल

0
27

blank

सडक अर्जुनी,दि.05- तालुक्यातील बाम्हणी येथे दुषित पाण्यामुळे व जेवणामुळे तब्बल ३३ जणांना गॅस्ट्रोची लागण होऊन विषबाधा झाल्याची घटना उघडकीस आली आहे. गावात रात्रीच्या सुमारास कार्यक्रमात ग्रामस्थांनी जेवण केल्यानंतर उलटी तसेच हागवणीचा त्रास सुरु झाल्याने त्यांना सडक अर्जुनी येथील ग्रामीण रुग्मालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.रुग्णांमध्ये १८ पुरुष, ८ लहान मुली, ५ लहान मुल व २ महिलांचा समावेश आहे. अन्नाचे तसेच पाण्याचे नमुने घेऊन तपासणी करिता पाठविण्यात आले आहे.बाम्हणी येथे आरोग्य विभागाच्यावतीने शिबिर लावण्यात आले आहे.

blank