33.9 C
Gondiā
Monday, June 8, 2026
Home Top News चाळीसगावच्या बीडीओचा विषप्राशन करुन आत्महत्येचा प्रयत्न

चाळीसगावच्या बीडीओचा विषप्राशन करुन आत्महत्येचा प्रयत्न

0
32

blank

चाळीसगाव,दि.2 – येथील पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मधुकर वाघ यांनी पंचायत समितीच्या सभागृहात बैठक सुरू असतांना विष घेवून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याने एकच खळबळ उडाली आहे.येथील पंचायत समितीच्या सत्ताधाऱ्यांनी गटविकास अधिकारी वाघ यांना सक्तीच्या रजेवर पाठवले आहे. आज ते आपल्या कार्यालयात आलेले असताना मिटिंग हॉल मध्ये पदाधिकाऱ्यांची मासिक बैठक सुरू होती. यावेळी अचानक गटविकास अधिकारी  वाघ हे आपल्या कॅबिनमधून आले व त्यांनी विष प्राशन केल्याचे सांगितले. हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांना शहरातील देवरे रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. गेल्या काळात लाभार्थ्यांना वाटप करण्यात येणाऱ्या विहिरींचे प्रकरण सध्या गाजत आहे. याच प्रकरणात वाघ यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले आहे. दरम्यान, त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असून प्राप्त माहितीनुसार वाघ यांच्या खिशात सुसाईड नोट असल्याचे वृत्त असून अधिक तपशील कळू शकलेला नाही.

blank