25.8 C
Gondiā
Sunday, August 16, 2026
Home Featured News भारतीय संविधानाचे मोफत वितरण करा

भारतीय संविधानाचे मोफत वितरण करा

0
20

अहेरी,दि.15ः- संविधानाची ओळख सर्वांना करून देण्याच्या अनुषंगाने भारतीय संविधान राष्ट्रग्रंथ मोफत वितरीत करण्यात यावे, अशी मागणी पंचायत समिती सदस्या शकुंतला झोडे यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, समाजातील बहुतेक नागरिकांना तसेच संविधानानुसार काम करणार्‍या सर्व यंत्रणेतील अधिकारी, कर्मचारी, लोकप्रतिनिधींना संविधानाची ओळखही नाही. त्यामुळे राज्यातील सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालय, जिल्हा परिषद, पंचायत समिती, महानगरपालिका, नगरपालिका, ग्रामपंचायत, सर्व प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळा, उच्च माध्यमिक शाळा, खाजगी शाळा, खाजगी आर्शमशाळा, महाविद्यालये आदींना भारतीय संविधान राष्ट्रग्रंथ मोफत वितरित करण्यात यावा. तसेच राज्यातील सर्व ग्रामपंचायत सदस्य, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, सहकारी संस्थेचे सदस्य, विधानसभा सदस्य, लोकसभा सदस्य, महिला बचत गटाचे प्रतिनिधी सदस्य, कृषी कर्मचारी, वनकर्मचारी व सर्व शिक्षण विभागातील अधिकारी, कर्मचारी, पोलिस विभागातील अधिकारी, कर्मचारी यांना भारतीय संविधान राष्ट्रग्रंथ शासनाकडून मोफत पुरवठा करण्यास्तव हिवाळी अधिवेशनात सदर विषय ठेवण्यात यावा, अशीही मागणी पं.स. सदस्या झोडे यांनी निवेदनातून केली आहे.