23.5 C
Gondiā
Sunday, August 23, 2026
Home विदर्भ झोपडीवर मोबाईल टॉवर कोसळला !

झोपडीवर मोबाईल टॉवर कोसळला !

0
26

नागपूर,दि.21:हिंगणा तालुक्यातील ईसासनी गावातील रिलायन्स मोबाईलचा टॉवर एका झोपडीवर कोसळला हि दुपारी एक वाजता घडली असून ,सुदैवाने कोणतीच जीवित हानी झाली नाही.सविस्तर वृत्त असे की,इसासनी गावातील हंबरस कॉलनीनितील एका झोपडीवर हा दुपारी एक च्या सुमारास हा टॉवर कोसळला त्यावेळी रामचंद्र सुदर्शन काठवते व सुभद्रभाई काठवते हे दोघेही घरात होते.काहीतरी घरावर कोसळण्याच्या त्यांना आवाज आला,आणि सावधगिरी बाळगत दोघेही घराच्या बाहेर पळाले,तेव्हा क्षणात त्यांच्या झोपडी वजा घरावर तो टॉवर कोसळला.घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन चौकशी सुरु केली आहे. दरम्यान या टॉवर ला इसासनी ग्रामपंचायत प्रशासनाने परवानगी दिली होती काय ? संबंधित टॉवर कंपनी टॉवर मुळे क्षतिग्रस्त झालेल्या घराची नुकसान भरपाई देईल का ?हा प्रश ऐरणीवर आला आहे.