25.1 C
Gondiā
Friday, August 28, 2026
Home विदर्भ खासगी बस जळून खाक, २५ प्रवासी बचावले

खासगी बस जळून खाक, २५ प्रवासी बचावले

0
27

यवतमाळ ,दि.२४ः- कोल्हापूरवरून नागपूरला जाणारी खासगी बसला महागाव तालुक्यातील मुडाणा गावाजवळ अचानक आग लागली. चालकाच्या प्रसंगावधानाने बसमधील २५ प्रवासी सुखरूप बचावले. ही घटना रविवारी पहाटे १.३० वाजताच्या सुमारास घडली.
कोल्हापूरवरून अनुराग ट्रॅव्हल्स (एम.एच.०४/एफ.के.१४७५) नागपूरकडे जात होती. महागाव तालुक्यातील मुडाणा गावाजवळ शिवतेज ढाब्याजवळ बसमधून अचानक धूर निघताना दिसला. चालकाने प्रसंगावधान राखून बस रस्त्याच्या कडेला उभी केली. सर्व २५ प्रवाशांना बसच्या खाली उतरविले. काही वेळातच बसने पेट घेतला. संपूर्ण बस आगेच्या कवेत सापडली. रात्रीची वेळ असल्याने बस विझविण्यासाठी मदत मिळाली नाही. महागाव तालुक्यात खासगी बस पेटण्याची ही पहिलीच घटना होय. महागाव पोलिसांनी या घटनेचा पंचनामा केला. आग कशामुळे लागली, हे कळू शकले नाही.