26.9 C
Gondiā
Friday, August 28, 2026
Home विदर्भ ट्रकच्या धडकेने दौलतजी चव्हाण ठार

ट्रकच्या धडकेने दौलतजी चव्हाण ठार

0
26

गोंदिया,दि.25 :-आमगाववरून गोंदिया कडे येत असता ट्रक च्या धडकेत दौलतजी चव्हाण रा. हनुमाननगर, अदासी यांचे 24 डिसेंबर रोजी रात्री आठ वाजता दरम्यान आमगाव – गोंदिया रस्त्यावर दहेगाव जवळ अपघाती निधन झाले. ते 60 वर्षे वयाचे होते. सालेकसा धानोलीवरून तेरवीचे कार्यक्रम आटोपून घरी येत असताना दहेगाव जवळ नादुरुस्त ट्रक उभा होता. यादरम्यान समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने त्यांच्या स्पलेंडर गाडीला जबर धडक दिली. यात घटनास्थळीच त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी आमगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपी चालकाला अटक केली आहे