34.4 C
Gondiā
Friday, June 5, 2026
Home मराठवाडा/खान्देश रिपब्लिकन सेनेच्या विद्यार्थी आघाडीने भाजप खासदार अनंत हेगडेंचा पुतळा जाळला

रिपब्लिकन सेनेच्या विद्यार्थी आघाडीने भाजप खासदार अनंत हेगडेंचा पुतळा जाळला

0
21

blank

औरंगाबाद,दि.27(विशेष प्रतिनिधी)-राज्यघटना बदलण्याचे वक्तव्य करणारे भारतीय जनता पक्षाचे खासदार अनंत हेगडे यांचा रिपब्लिकन सेनेच्या विद्यार्थी आघाडीतर्फे बुधवारी (ता.27) भडकल गेटसमोर पुतळा जाळण्यात आला. यावेळी या खासदार विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. यात रिपब्लिकन सेनेच्या कार्यकर्ते सचिन निकम व त्यांच्या काही साथीदारांना पोलिसांनी ताब्यात घेतले.भाजपच्या जिल्हा कार्यालयावर ही शाई फेकण्यात आली. खासदार अनंत हेगडे यांच्या राज्यघटना बदलण्याची वक्तव्यानंतर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खरात) गटाच्या काही महिला कार्यकर्त्यांनी बुधवारी (ता.27) भारतीय जनता पक्षाच्या जिल्हा कार्यालयात जाऊन शाई व निषेधाचे पत्रक फेकले. खासदारांविरोधात घोषणाबाजी केली. या घटनेनंतर तत्काळ जिल्हा कार्यालयास पोलिस बंदोबस्त देण्यात आला. याप्रकरणी भाजप शहर जिल्हा उपाध्यक्ष जालिंदर शेंगडे यांनी वेदांतनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

blank