शेतकऱ्यांना मिळणार मदत आमदार वाघमारेची पत्रपरिषदेत माहिती

0
8

भंडारा,दि.27 : धान उत्पादक जिल्ह्यातील आमदारांनी एकत्रितपणे शेतकऱ्यांना मदतीची मागणी रेटून धरल्याने अखेर शासनाने बोनस आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याचे जाहिर केले. शासनाच्या निर्णय शेतकऱ्यांना दिलासा देणारा आहे. हिवाळी अधिवेशनात तुमसर मतदार संघातील अनेक प्रश्न निकाली काढण्यात यश आल्याचे तुमसर विधानसभा मतदार संघाचे आमदार चरण वाघमारे यांनी पत्रपरिषदेत सांगितले.
अधिवेशन संपल्यानंतर तुमसर विधानसभा मतदार संघाच्या दृष्टीने झालेल्या कामाची माहिती देण्याकरिता आ. चरण वाघमारे यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. ३० जुलैपर्यंत रोवणी न झालेल्या शेतकºयाला मदत देण्याच्या विषयाला घेवून सभागृह तहकुब करण्यात आले. त्याअनुषंगाने राज्याच्या कृषी मंत्र्यांनी धान उत्पादक भागातील आमदाराचे बैठक घेऊन तोडगा काढण्याचे आश्वासन दिले. त्यानुसार नुकसानीपोटी मदत देण्याचा निर्णय शासनाने घेतला असल्याचे आ. चरण वाघमारे हे म्हणाले.
जिरा येथील शेतीसाठी हेक्टरी सात हजार ९७० तर बागायती शेतीसाठी १५ हजार ६७० रूपये मदत दिली जाणार असल्याचे सांगत दोन हेक्टरची मर्यादा आखून देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. आजपर्यंत भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मदत देताना जिरायती शेतीचे निकष लावले जात होते. मात्र येथील शेतकऱ्यांच्या सात-बारावर सिंचनाचा उल्लेख असल्याने व बºयाच शेतकऱ्यांकडे सिंचनाची सोय असल्याने त्याला बागायती मदत दिली जावी, असे सांगून कृषी मंत्री त्याबद्दल सकारात्मक जिल्ह्यातील ९० टक्के शेतकऱ्यांना बागायतीच्या धर्तीवर मदत मिळेल, असा विश्वास यावेळी वाघमारे यांनी व्यक्त केला.
३० जुलैपर्यंत रोवणी न झालेल्या शेतकऱ्यांना प्रधानमंत्री विमा योजनेचा लाभ मिळणार असून यासाठी जिल्ह्यातील ११ राजस्व विभाग पात्र ठरले आहेत. साकोतील एक वगळता उर्वरित १० राजस्व विभाग हे तुमसर मतदार संघातील असल्याचे ते म्हणाले. ज्या शेतकऱ्यांनी पीक कर्ज घेतले आहे त्यांना १०० टक्के विमा मिळणार असून खाजगी संस्थांकडून कर्ज घेणाऱ्या संस्थांनाही मदतीचा लाभ मिळणार असल्याचे सांगत हेक्टरी ९,८०० रूपयांची मदत अशा लोकांनाही दिली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. शासनाने २०० रूपये बोनस देण्यात येणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा देणार असल्याने त्यांनी स्पष्ट केले. जिल्ह्यात आतापर्यंत ३७ हजार २९५ शेतकऱ्यांना ८१ कोटी २० लाख रूपयांचा कर्ज माफिचा लाभ मिळाला असल्याचे त्यांनी सांगितले.