37.9 C
Gondiā
Friday, June 5, 2026
Home विदर्भ काम न करता ठेकेदाराने उचलले ३ लाख,अभियंत्याचा सहभाग

काम न करता ठेकेदाराने उचलले ३ लाख,अभियंत्याचा सहभाग

0
26

blank

गोंदिया,दि.२९. -गोंदिया जिल्हा परिषदेचा बांधकाम विभाग म्हटले की गैरव्यवहाराचा संबध नसेल असे होऊच शकत नाही.त्याचे असे की गोंदिया जि.प.बांधकाम उपविभागातर्गंत गोंदियाच्या उपअभियंत्याने ठेकेदाराला हाताशी धरुन चक्क रस्ताच खाऊन टाकला नव्हे तर त्या रस्ता बांधकामाचे २ लाख ९६ हजार ११६ रुपयाचा बिल काम न करताच उचलल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे.सविस्तर असे की,जि.प.बांधकाम उपविभागातंर्गत फुलचूर ते छोटा गोंदिया या रस्ता बांधकामासाठी २२ मे २०१७ रोजी २ लाख ९६ हजार ८८६ रुपयाच्या कामाचे कार्यारंभ आदेश देण्यात आले.त्यासाठी बाळकृष्ण मजूर सहकारी संस्थेला कंत्राट देण्यात आले होते.परंतु या रस्त्यावर एकही ट्रिप मुरूम व गिट्टी न घालता काम करण्यात आल्याचे दाखवून बिल काढले.या कामात ठेकेदार,शाखा अभियंता व उपविभागीय अभियंता यांचे सगंनमताशिवाय े होऊ शकत नाही.हे प्रकरण समाजसेवक प्रकाश जायस्वाल यांनी उघडकीस आणत संबधित विभागाला माहिती दिली.मात्र अधिकारी समाधानकारक उत्तर देऊ शकले नाही.यासंबधी उपविभागीय अभियंता निमकर यांना विचारणा केली असता काम झल्याचे सांगितले.तर कार्यकारी अभियंता वैरागकर यांना भ्रमणध्वनीवर विचारणा करण्याकरिता संपर्क केला असता त्यानी प्रतिसाद दिला नाही.या कामाच्या चौकशी साठी चौकशी समितीची गरज निर्माण झाली आहे.वास्तविक गोंदिया जिल्हा परिषदेच्या या उपविभागातंर्गत मोठ्या कामात गैरप्रकार असल्याची नेहमीच ओरड नागरिकांची असते.फुलचूर ते संजयनगर मार्ग छोटा गोंदिया या रस्त्याचे काम झालेले नसतानाही अधिकारी काम झाल्याचा कांगावा करीत आहेत तर दुसरीकडे त्या मार्गावरील 100 -125 लोक काम न झाल्याचे सांगत आहेत मग खरे अधिकारी की जनता हे तपासण्याची गरज निर्माण झाली आहे.

blank