34.5 C
Gondiā
Thursday, June 4, 2026
Home विदर्भ अमोल कोंडबत्‍तुनवार यांच्‍या निधनाने सच्‍चा कार्यकर्ता हरपला – सुधीर मुनगंटीवार

अमोल कोंडबत्‍तुनवार यांच्‍या निधनाने सच्‍चा कार्यकर्ता हरपला – सुधीर मुनगंटीवार

0
20
चंद्रपूर,दि.30ः- भाजपा च्‍या सोशल मिडीया सेलचे जिल्‍हाध्‍यक्ष अमोल कोंडबत्‍तुनवार यांच्‍या अपघाती निधनाने भारतीय जनता पार्टीची मोठी हानी झाली असुन आमच्‍या परिवारातील एक सच्‍चा कार्यकर्ता हरपला, अशा शब्‍दात अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आपल्‍या शोकभावना व्‍यक्‍त केल्‍या. दिनांक 30 डिसेंबर रोजी चंद्रपूरात झालेल्‍या श्रध्‍दांजली सभेत अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आपल्‍या शोकभावना व्‍यक्‍त केल्‍या. अमोल कोंडबत्‍तुनवार यांच्‍या परिवारासोबत भारतीय जनता पार्टी खंबीरपणे उभी राहील. त्‍यांच्‍या पुण्‍यात्‍म्‍याला परमेश्‍वर शांती प्रदान करो व या दुःखातुन सावरण्‍याचे बळ त्‍यांच्‍या कुटूंबियांना मिळो, असेही ते यावेळी बोलताना म्‍हणाले. यावेळी आ. नानाजी शामकुळे, माजी आमदार शोभाताई फडणवीस, भाजपा नेते प्रमोद कडू, महानगरपालिकेचे स्‍थायी समिती सभापती राहूल पावडे आदींसह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्‍येने उपस्थित होते.