हळदी-कुंकूच्या माध्यमातून मिळणार ‘स्वच्छतामय’ संक्रातीचा संदेश

0
15

१५ ते ३० जानेवारीपर्यंत कार्यक्रमांचे आयोजन
१ व ३ जानेवारी रोजी विशेष ग्रामसभेचे आयोजन

गोंदिया,दि.३० : महाराष्ट्रात संक्रांतीनंतर महिलांमध्ये वाण वाटून आपले नातेसंबंध दृढ करण्याची प्रथा आहे. याच बाबीला हेरून जिल्हा परिषद गोंदियातर्पेâ ‘स्वच्छतामय संक्रांतीचे हळदी-कुंकू’ हा उपक्रम राबवून जिल्ह्यातील सर्व गावांमधील महिलांची नाळ स्वच्छतेशी जोडण्याचे कार्य करण्यात येणार आहे. या उपक्रमाची सुरुवात प्रशिक्षणाच्या माध्यमातून झाली आहे. विशेष म्हणजे, या उपक्रमासाठी १ जानेवारी रोजी स्वच्छ व प्लास्टिकमुक्त अभियानासाठी विशेष ग्रामसभा तर ३ जानेवारी रोजी महिलांची ग्रामसभा प्रत्येक ग्रामपंचायतीत आयोजित करण्यात आली आहे. तर १५ ते ३१ जानेवारीपर्यंत जिल्ह्यातील १७९७ अंगणवाडी केंद्रांत कमाल १०० महिलांसाठी हळदी-कुंकवाचा कार्यक्रम आयोजित करून या माध्यमातून स्वच्छतेचा संदेश देण्यात येणार आहे, अशी माहिती आज (दि.३०) जिल्हा परिषदेच्या सभागृहात आयोजित पत्रपरिषदेत जि.प. अध्यक्ष उषाताई मेंढे व सीईओ रवींद्र ठाकरे,संपुर्ण स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेश राठोड,महिला बालकल्याण विभागाचे उपमुकाअ पारखे यांनी दिली.
गोंदिया जिल्हा हागणदारीमुक्त झाला असून गोंदिया जिल्ह्याची वाटचाल आता ‘ओडीएफ प्लस’कडे होत आहे. त्यानुसार महिलांच्या माध्यमातून संपूर्ण स्वच्छतेकडे पोहोचण्याचे धोरण शासनाने तयार केले आहे. तसेच पॉलीथीनमुक्तीच्या दिशेने ग्रामीण भागात वाटचाल करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून स्वयंपाकापूर्वी, जेवणापूर्वी, बाळाला भरविण्यापूर्वी, शौचाहून आल्यानंतर तसेच बाळाची शी धुतल्यानंतर हात साबणाने स्वच्छ धुणे, त्याची सवय लावून घेणे, महिला, मुलींसाठी ग्रामपंचायतस्तरावर स्वस्त दरात सॅनिटरी नॅपकीन उपलब्ध व्हावी, यासाठी व्हेडींग मशीनची व्यवस्था करणे,मासिक पाळीमध्ये उपयोगात येणार्या सॅनिटरी नॅपकिनचा वापर व त्याचे व्यवस्थापन,बाळाच्या विष्ठेचे व्यवस्थापन,पिण्याच्या पाण्याची योग्य साठवण व हाताळणी ,घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन,प्लस्टिक थैली,ग्लासेस,कप,प्लेटस आदींच्या वापरापासून परावृत्त करुन ग्रामपंचायती पाॅलिथिन मुक्त करणे,शौचालयांचा वापरावर भर देणे,गरोदर माता व किशोरवयीन मुलींना आवश्यक पोषण आहाराबाबत,जनजागृत करणे,महिला बचतगटांचे सक्षमीकरण ,स्थानिक उपलब्ध भाजीपाला व झांडाचे आहारात महत्व आदी बाबींचा समावेश या उपक्रमात करण्यात आला आहे.या उपक्रमातंर्गत 1 जानेवारी रोजी विशेष ग्रामसभा व 3 जानेवारी रोजी महिलांची ग्रामसभा आयोजित करण्यात आली आहे.त्यानंतर 4 ते 6 जानेवारी दरम्यान ग्रामपंचायत स्तरावरील प्रत्येक वार्डात सभेचे आयोजन करावयाचे आहे.4 ते 12 जानेवारी दरम्यान अगणवाडी पर्यवेक्षिका,अंगणवाडी सेविका, आरोग्य सेविका,आशा सेविका व उमेद अभियानाच्या समुदाय संशाधन व्यक्तीचे उजळणी प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे.महिला या ग्रामीण विकासाचा कणा व निर्णय प्रकियेतील महत्वाच्या घटक आहेत.स्वच्छतेच्या बाबतीत महिलांनापर्यंत सुयोग्य माहिती पोचविल्यास त्याचा गावातील संपुर्ण स्वच्छतेबाबत विधायक परिणाम होणार असल्याची आशा असल्याने स्वच्छतामय संक्रातीचे हळदीकूंकू हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.जिल्ह्यातील दीड लाख ग्रामीण महिलांपर्यंत स्वच्छतेचा संदेश पोचवा असा या उपक्रमांचा उद्देश आहे.उपक्रमासाठी 3655 कर्मचार्यांच्या समावेश,जिल्ह्यातील 58 अंगंणवाडी पर्यवेक्षिका,1535 सेविका,1483 अंगणवाडी मदतनिस तर 157 मिनि अगणवाडी सेविका असे 3277 कर्मचारी या उपक्रमासाठी कार्य करणार आहेत.उमेद अंतर्गत गाव स्तरावर 329 समुदाय संशाधन व्यक्ती,आयसीआरपी,तालुका स्तरावर 24 ब्लाक मिशन मॅनेजर आणि 15 समुह समन्वयक आहेत.स्वच्छ भारत मिशन अंतर्गत गटसाधन केंद्रातील 24 कर्मचारी आणि जिल्हास्तरावर 14 सल्लागार,16 नेहरु युवा केंद्राचे युवक केंद्राचे समन्वयक असे 3655 कर्मचार्यांचा समावेश या उपक्रमांतर्गत राहणार आहे.