33.9 C
Gondiā
Sunday, June 7, 2026
Home विदर्भ ग्रामसेविकेची माहीती अधिकारात माहिती देण्यास टाळाटाळ

ग्रामसेविकेची माहीती अधिकारात माहिती देण्यास टाळाटाळ

0
28

सडक अर्जुनी,दि.०१ः-तालुक्यातील ग्रामपंचायत खोबा/हलबी येथे कार्यरत ग्रामसेविका एस.डी.वाढई यानी माहिती अधिकार कायद्याला बगल देत अर्जदारास आपण सदर गावातील नागरिक नसल्याने माहिती देता येणार नाही असे बोलून त्या अर्जदारास माहिती देण्यास टाळाटाळ केल्याचे प्रकरण समोर आले आहे.खोबा/हलबी येथील ग्रामपंचायत कार्यालयात माहिती अधिकार कार्यकत्र्याने २८डिसेंबर १७ रोजी अर्ज केला असता ग्रामसेविका वाढई यांनी सदर माहिती ही ग्रामपंचायत क्षेत्रात कार्यरत नागरिकांनाच देतो बाहेरच्या गावातील नागरिकांना देता येत नाही असे सांगून माहिती अधिकार कायद्याची अवहेलनाच केली आहे.यापुर्वी एक महिना आधी अर्ज केला असता सदर ग्रामसेविकेने चुकीची माहिती माहिती अधिकार कायद्यांतर्गत दिलेली होती.त्यावर वास्तविक माहिती मिळावी यासाठी पुन्हा अर्ज करण्यात आला तरीही माहिती न दिल्याने अर्जदाराने अपिलीय अधिकारी गटविकास अधिकारी पंचायत समिती यांच्याकडे सदर विषय सादर केल्यानंतर माहिती देण्याबाबत आश्वासन दिले गेले असले तरी अशा ग्रामसेविकेवर कारवाई होणे अपेक्षित आहे.त्यातच गोरेगाव पंचायत समितीतंर्गत येत असलेल्या सटवा येथील ग्रामसेविकेनेसुध्दा एका प्रकरणात माहिती देण्यास तब्बल तीन महिन्याचा काळ घेतला असून एक साधी माहिती पुरविण्यास टाळाटाळ केल्याने गोरेगाव पंचायत समितीच्या गटविकासअधिकाèयांनी सटवा येथील ग्रामसेविकेवर सुध्दा कारवाई करण्याची गरज निर्माण झाली आहे.

blank