33.9 C
Gondiā
Saturday, June 6, 2026
Home राष्ट्रीय देश धुक्यामूळे २४ रेल्वेगाड्या विलंबाने

धुक्यामूळे २४ रेल्वेगाड्या विलंबाने

0
24

blank

नागपूर,दि.05ः- उत्तर भारतात थंडीची लाट पसरली असून सर्वत्र धुके पसरले आहे. धुक्याचा प्रभाव रेल्वेगाड्यांवर पडल्याने नागपूर विभागातून धावणार्‍या तब्बल २४ रेल्वे गाड्या विलंबाने धावत असल्याची नोंद झाली तर हैदराबाद-नवी दिल्ली तेलंगणा एक्स्प्रेस रद्द करण्यात आली. नागपूर रेल्वेस्थानकावर गाड्यांच्या प्रतीक्षेत असलेल्या प्रवाशांना गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. प्रतिक्षालये फुल्ल झाले असून, फलाटावर प्रवाशांची गर्दी दिसून येते.
१८२३८ अमृतसर-बिलासपूर छत्तीसगढ एक्स्प्रेस सर्वाधिक २४ तास, त्या पाठोपाठ १२५८९ गोरखपूर-सिकंदराबाद एक्स्प्रेस १८ तास विलंबाने धावत होती. १२७0८ निजामुद्दीन-तिरुपती एक्स्प्रेस ६.२0 तास, २२४१६ नवी दिल्ली-विशाखापटनम एक्स्प्रेस ६.५0 तास, १२६४८ निजामुद्दीन – बंगलोर एक्स्प्रेस ६ तास, १२६२६ नवी दिल्ली – त्रिवेंद्रम 6 तास, १२४३४ निजामुद्दीन – चेन्नई एक्स्प्रेस २.१५ तास, १२१३९ मुंबई – नागपूर सेवाग्राम एक्स्प्रेस २.३0 तास, १२१६0 जबलपूर – अमरावती एक्स्प्रेस ४.२५ तास, २२४0३ पॉंडेचरी – नवी दिल्ली १२.३0 तास, १२४१0 निजामुद्दीन – रायगढ एक्स्प्रेस १५ तास, १२७२४ नवी दिल्ली – हैदराबाद एक्स्प्रेस १२ तास, २२६५२ निजामुद्दीन – बंगलोर एक्स्प्रेस ५.१0 तास, १६0३२ श्री वैष्णोदेवी (कटरा) – चेन्नई १६.३0 तास, १२७९२ पटना – सिकंदराबाद २.५0 तास, १२६१६ दिल्ली सराई रोहिल्ला – चेन्नई १0.३0 तास, १२४0९ रायगढ – निजामुद्दीन एक्स्प्रेस १३ तास, १२६२२ नवी दिल्ली -चेन्नई ९.१५ तास, १२५१२ त्रिवेंद्रम – गोरखपूर एक्स्प्रेस ३.४५ तास, १२७२२ निजामुद्दीन – हैदराबाद एक्स्प्रेस ६.३0 तास, १२२९६ दानापूर – बेंगळुरू संघमित्रा एक्स्प्रेस ४ तास, १२६७0 छपरा – चेन्नई एक्स्प्रेस १४ तास आणि १२६५0 निजामुद्दीन – यशवंतपूर एक्स्प्रेस ३.१५ तास विलंबाने धावत होती.
रेल्वेगाड्यांच्या लेटलतिफीमुळे प्रवाशांची चांगलीच गैरसोय होत आहे. तासनंतास उशिरा धावणार्‍या गाड्यांचे तिकीट असणार्‍या प्रवाशांना दुसर्‍या गाडीतून प्रवासाची परवानगी मिळविण्यासाठी धावाधाव करावी लागत आहे. याशिवाय प्रतीक्षालये, फलाटांवर प्रवाशांची गर्दी दिसून येत आहे. थंडीत कुडकूडत प्रवाशांना गाडीची वाट बघावी लागत आहे.

blank