
रायपूर,दि.24(वृत्तसंस्था)- छत्तीसगडमध्ये नारायपुरमध्ये नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात 4 जवान शहीद झाले असून 7 जण जखमी झाले आहेत. शहीदांमध्ये 2 पोलिस उप-निरीक्षक आणि 2 कॉन्स्टेबल आहेत. अबुझमाडच्या जंगलात ही घटना घडली आहे. याच दरम्यान नक्षलवाद्यांनी हा आत्मघाती हल्ला केला. 4 शहीद जवान हे राखीव दलातील होते.नक्षलविरोधी अभियानाचे विशेष महानिरीक्षक डी. एम. अवस्थी यांनी सांगितले की, जवानांना माहिती मिळाली होती की, अबूझमाडमध्ये नक्षलवादी जमा झाले आहेत. ही माहिती मिळाल्यावर 400 जवानांना शोध मोहिमेवर पाठविण्यात आले होते.जंगलात नक्षलवादी जवानांवर हल्ला करण्यासाठी लपून बसलेले होते. सकाळी 11 च्या सुमारास नक्षलवादी आणि जवानांमध्ये चकमक झाली.





