32.7 C
Gondiā
Friday, June 5, 2026
Home गुन्हेवार्ता फुटाळा तलावात पत्नी, मुलीसह पतीची आत्महत्या

फुटाळा तलावात पत्नी, मुलीसह पतीची आत्महत्या

0
35

blank

नागपूर,दि.03– नागपुरातील एकाच कुटुंबातील तिघांचे मृतदेह तलावात आढळल्याने खळबळ उडाली आहे. येथील फुटाळा तलावात पती, पत्नी आणि पाच वर्षांच्या मुलीचा मृतदेह सापडला आहे. या कुटुंबाने सामुहिक आत्महत्या केली असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. शनिवारी सकाळी ही घटना समोर आली.नागपूर पोलिसांनी तिन्ही मृतांची ओळख पटवली असून मृत निलेश शिंदे (35) पत्नी रुपाली शिंदे (32) आणि 3 वर्षांची मुलगी नाहली शिंदे यांच्यासोबत शहरातील तेलंगखेडी हनुमानमंदिर परिसरात राहात होता.blank blankशिंदे कुटुंबातील तिघांनी रात्री आत्महत्या केली असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. या घटनेची माहिती अंबाझरी पोलिसांना कळाल्यानंतर शनिवारी सकाळी मृतदेह बाहेर काढण्यात आले.शिंदे कुटुंबाने सामूहिक आत्महत्या करण्यामागे काय कारण आहे, हे अद्याप कळालेले नाही.

blank