36.6 C
Gondiā
Monday, June 8, 2026
Home Top News गडचिरोलीमध्ये डायनासोरचे अवशेष

गडचिरोलीमध्ये डायनासोरचे अवशेष

0
23

blank

गडचिरोली(अशोक दुर्गम),दि.४~ जिल्हय़ातील सिरोंचा तालुक्यातील कोटापल्ली येथे डायनासोर, मासे व झाडांचे हजारो वर्षांपूर्वीचे अवशेष सापडले आहेत. अमेरिका व भारतातील जीवाश्म वैज्ञानिकांनी घटनास्थळाला भेट देऊन अवशेषाचे संशोधन सुरू केले आहे. विशेष म्हणजे यापूर्वी २०१५ मध्येही येथे डायनासोरचे अवशेष सापडलेले आहेत.महाराष्ट्र-तेलंगणा राज्यांच्या सीमेवरील गडचिरोली जिल्हय़ात गोदावरी व इंद्रावती नदीच्या काठावर सिरोंचा तालुका आहे. निसर्गाची मुक्त उधळण येथे पाहायला मिळते. तालुक्याच्या ठिकाणाहून २० किलो मीटरवर कोटापल्ली, चिट्टर व बोरगुडम येथे डायनासोरचे जीवाश्म असल्याची माहिती मिळाल्यावर त्या भागाचे उपवनसंरक्षक तुषार चव्हाण यांनी वैज्ञानिकांच्या चमूला पाचारण केले. या चमूमध्ये अमेरिकेतील वॉशिंग्टन विद्यापीठातील डॉ. जॉर्ज विल्सन, डॉ. जेफ विल्सन, भारतातील डॉ. धनंजय मोहबे, डॉ. डी. के. कापगते यांचा समावेश होता.

‘फॉसिल पार्क’चा प्रस्ताव

सिरोंचा परिसरात डायनासोर, मासोळी, झाडे तसेच जीवाश्म सापडत असल्यामुळे येथे ‘फॉसिल पार्क’ तयार करण्याचा शासनाचा प्रस्ताव आहे. वनविभागाने राज्य शासनाकडे एक प्रस्तावही सादर केलेला आहे. त्यावर विचार सुरू आहे.

अभ्यासकांचा ओघ

डायनासोरचे अवशेष सापडल्यामुळे मुंबई, पुणे, बंगलोर, येथून मोठय़ा संख्येने संशोधक येथे येत आहेत. यामुळे सिरोंचाचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचले आहे.

blank