34.5 C
Gondiā
Monday, June 8, 2026
Home राजकीय परसवाडयातील युवकांचा शिवसेनेत पक्षप्रवेश

परसवाडयातील युवकांचा शिवसेनेत पक्षप्रवेश

0
40

blank

तुमसर,दि.06 : भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यातील परसवाडा गावातील अनेक तरुणांनी शिवसेना पक्षावर विश्वास ठेवुन जिल्हा प्रमुख इंजी. राजेंद्र पटले यांच्या प्रमुख उपस्थितीत पक्षप्रवेश घेतला. शिवसेनेचे अनेक भव्य आक्रमक आंदोलनातली आग बघुन हे तरुण खुप प्रभावित झाले. खंबाटा फेरो युनीववर्सल कंपनीचा आंदोलन व शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेक धगधगते आंदोलन जे फक्त शिवसेनेत दिसते. यामुळे या तरुणांनी शिवसेनेते प्रवेश घेतला.यामध्ये विनोद शेंडे, पुरुषोत्तम सिंगाड़े, नितेश वाडीभस्मे, नितेश पाटिल, सुधाकर पंधरे, नीलकंठ सिंगाड़े, आशीष भगत, राज सेलोकर, ईश्वर भोयर, राहुल गायधने, संदीप भूरे, नरेंद्र वंजारी, अमरीश तिवारी यांचा समावेश आहे. यावेळी शिवसेनेचे शहर प्रमुख नितिन सेलोकर, मनोहर जांगले, कैलाश जलवाने, मनोज चौबे, जगदीश त्रिभुनकर, गुड्डू डहरवाल, विक्रांत तिवारी सह पदाधिकारी उपस्थित होते.

blank