24.8 C
Gondiā
Friday, August 21, 2026
Home विदर्भ सौंदडच्या परिक्षा केंद्रावर पोलीसांच्या देखरेखीत कॉफीचा पुरवठा

सौंदडच्या परिक्षा केंद्रावर पोलीसांच्या देखरेखीत कॉफीचा पुरवठा

0
45

सडक अर्जुनी,दि.२१ः- आजपासून राज्यात इयत्ता १२ वीच्या परिक्षेला सुरवात झाली आहे.कॉपीमुक्त परिक्षेसाठी परिक्षा मंडळाने यावेळी अनेक उपाययोजना आखल्या असल्यातरी गोंदिया जिल्ह्यातील सौंदड येथील परिक्षा केंद्रावर पहिल्याच दिवशी पोलीसांच्या उपस्थितीतच कॉप्यांचा पुरवठा होत असल्याचे चित्र समोर आले आहे.सौंदड येथील रामेश्वरदास जमनादास लोहीया या परिक्षाकेंद्रावर आज इंग्रजीचा पेपर सुरु होताच पोलीस व होमगार्ड यांचा बंदोबस्त असतानाही खिडक्यांवर चढून बाहेरील युवक कॉप्या देत असताना आणि खाली पोलिस बघ्याची भूमिकेत असल्याचे चित्र समोर आले आहे.