23.9 C
Gondiā
Wednesday, August 19, 2026
Home विदर्भ अदासीचे सरपंच रवि पंधरे यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

अदासीचे सरपंच रवि पंधरे यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

0
35
गोंदिया : आमदार गोपालदास अग्रवाल यांच्या कुशल नेतृत्व झुंजार कार्यप्रणालीवर प्रभावित होऊन अदासीचे सरपंच रवि पंधरे यांनी आ.अग्रवाल यांच्या जनसंपर्क कार्यालयात काँग्रेसमध्ये प्रवेश केला. दरम्यान त्यांनी काँग्रेस पक्षाला परिसरात घराघरात पोहोचवून पक्ष मजबुतीकरीता कार्य करणार असल्याचे सांगितले.
यावेळी युवा काँग्रेस नेता विशाल अग्रवाल, जि.प.सदस्य विठोबा लिल्हारे, रूद्रसेन खांडेकर, भाष्कर रहांगडाले, रामसिंह परिहार, जितेंद्र रहेकरवार, मंगल ठाकरे, केवलराम उके, उमराव पटले, बंटी बहेकार, बबू केजरकर, चंद्रपाल बनकर व अन्य उपस्थित होते.
यावेळी पंधरे म्हणाले, नागरिक व शेतकºयांच्या हिताचे सरकार असल्याचे सांगून भाजपा सरकारने नागरिकांशी धोकाबाजी केली असून मुख्यमंत्री हे फक्त घोषणाबाजी करून शेतकºयांची बोळवण करीत असल्याचा आरोपही त्यांनी केला