24.9 C
Gondiā
Monday, August 17, 2026
Home Top News उद्धव ठाकरे यांच्या ताफ्यावर अहमदगरमध्ये दगडफेक

उद्धव ठाकरे यांच्या ताफ्यावर अहमदगरमध्ये दगडफेक

0
45

अहमदनगर,दि.27(विशेष प्रतिनिधी)-अहमदनगर जिल्ह्यात शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाहन ताफ्यावर दगडफेक करण्यात आली आहे. एबीपी माझाने हे वृत्त दिले आहे. शेतकरी मेळाव्यासाठी उद्धव ठाकरे अहमदनगरला गेले आहेत. या दगडफेकीत काही शिवसैनिक जखमी झाल्याचे वृत्त आहे. आमदार विजय औटी यांच्या वाढदिवसानिमित्त हा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. निलेश लंके यांच्या गटाने दगडफेक केल्याचा आरोप आहे. निलेश लंके विजय औटी यांचे प्रखर विरोधक समजले जातात.