23.6 C
Gondiā
Thursday, August 27, 2026
Home महाराष्ट्र ‘मंत्रालयात उंदीर दाखवा एक लाख रूपये मिळवा’

‘मंत्रालयात उंदीर दाखवा एक लाख रूपये मिळवा’

0
27

नाशिक,दि.26(विशेष प्रतिनिधी) : मंत्रालयातील ऊंदीर मारण्यासाठी देण्यात आलेल्या कंत्राट घोटाळ्याची चौकशी करून मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी प्रहार संघटनेच्यावतीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करून निवेदन देण्यात आले.
विधीमंडळाच्या अधिवेशनात भाजपाचे नेते आमदार एकनाथ खडसे यांनी मंत्रालयातील उंदीर मारण्यासाठी देण्यात आलेल्या कंत्राटाबाबत प्रश्न चिन्ह निर्माण करून यातील घोटाळा उघडकीस आणला होता. त्या अनुषंगाने प्रहार संघटनेने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ‘मंत्रालयात उंदीर दाखवा एक लाख रूपये मिळवा’ असा फलक लावून धरणे आंदोलन केले. यावेळी आंदोलनकर्त्यांनी महाराष्ट्र सरकार व घोटाळेबाज अधिकाऱ्यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. आंदोलनकर्त्यांनी जिल्हाधिका-यांना निवेदन सादर केले. या आंदोलनात अनिल भडांगे, महेश आव्हाड, दत्तु बोडके, प्रकाश चव्हाण, सचिन पानमंद, बबलू मिर्झा, जगन काकडे, शाम गोसावी, शरद शिंदे, उमेश शिंदे, किरण गोसावी आदी उपस्थित होते.