23.5 C
Gondiā
Sunday, August 30, 2026
Home Top News चौथीच्या विद्यार्थ्याची धारदार शस्त्रानं निर्घृण हत्या

चौथीच्या विद्यार्थ्याची धारदार शस्त्रानं निर्घृण हत्या

0
34

नाशिक,दि.28ः – मुरबाड शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या नांदेणी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत अज्ञाताकडून इयत्ता चौथीतील विद्यार्थ्याची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. धक्कदायक बाब म्हणजे भानामतीसाठी या विद्यार्थ्याची हत्या करण्यात आल्याचे वृत्त समोर आले आहे. सुरज भोईर असे हत्या करण्यात आलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. या घटनेमुळे विद्यार्थी व पालक वर्गात सर्वत्र खळबळ माजली आहे. सुरज भोईर लघवीसाटी बाहेर गेला होता, मात्र तो शाळेत परतलाच नाही. त्याचा शोध घेतला असता शाळेशेजारील ओसाड घरात सुरज रक्ताच्या थरोळ्यात पडलेला आढळला. शाळेतील विद्यार्थ्यांने ही बाब शिक्षकांच्या निदर्शनास आणून दिले असता शिक्षकांनी सुरजला  उठवण्याचा प्रयत्न केला. परंतु तो बेशुद्ध अवस्थेत असल्यानं शिक्षकांनी पालकांना बोलावून घेतले. यानंतर त्याला ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. पोलीस निरिक्षक अजय वसावे यांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरू केला असून मारेकऱ्यांचा शोधदेखील सुरू करण्यात आला आहे.