33.9 C
Gondiā
Friday, June 5, 2026
Home गुन्हेवार्ता कामगार नेते अशोक देठे यांची हत्या

कामगार नेते अशोक देठे यांची हत्या

0
15

यवतमाळ दि.१: वणी तालुक्यातील कुंभारखनी वेकोली वसाहतीत जुन्या वैमनस्यातून कामगार नेता अशोक चारूदत्त देठे (45) याची शनिवारी रात्री हत्या करण्यात आली. या हल्ल्यात मृताची पत्नी गंभीर जखमी झाली. तिच्यावर वणीतील एका खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आली. उमेश किशोरचंद्र राय (27), लक्ष्मीकांत राय (25) सुरज सागर (25) अशी आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी आरोपीविरुद्ध कलम 302,(34)अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

blank