36.6 C
Gondiā
Tuesday, June 9, 2026
Home Top News पोलीस चकमकीत ३ नक्षलवादी ठार

पोलीस चकमकीत ३ नक्षलवादी ठार

0
29
file photo

blank

गडचिरोली,दि.03ः-मंगळवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास सिरोंचा तालुक्यातील व्यंकटापूर(बामणी) नजीकच्या सिरकोंडा जंगलात पोलिसांशी झालेल्या चकमकीत ३ नक्षलवादी ठार झाले. मृतांमध्ये नक्षल्यांच्या विभागीय समितीचा सदस्य सुनील कुळमेथे याचा समावेश असल्याची माहिती आहे.प्राथमिक माहितीनुसार, मंगळवारी सकाळी सी-६० पथकाचे जवान व्यंकटापूर परिसरातील सिरकोंडा जंगलात नक्षलविरोधी अभियान राबवीत असताना नक्षल्यांनी पोलिसांवर गोळीबार केला. प्रत्युत्तरादाखल पोलिसांनीही गोळीबार केला. या तुफान धुमश्चक्रीनंतर घटनास्थळाची पाहणी केली असता पोलिसांना ३ नक्षलवाद्यांचे मृतदेह आढळून आले. पोलिसांनी तिन्ही मृतदेह व मोठ्या प्रमाणावर नक्षल साहित्य ताब्यात घेतले आहे. मृतांमध्ये १ पुरुष व दोन महिला नक्षल्यांचा समावेश असल्याची माहिती आहे. नक्षल्यांचा डीव्हीसी सुनील कुळमेथे याचा मृतांमध्ये समावेश असल्याचे सांगितले जात असून, सुनीलच्या पत्नीलाही या चकमकीत प्राण गमवावा लागल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्या परिसरात नक्षलविरोधी अभियान अजूनही राबविले जात आहे.

blank