
गोल्ड कोस्ट(वृत्तसंस्था)दि.१५ : : राष्ट्रकुल स्पर्धेत फुलराणी सायना नेहवाल हिने बाजी मारली आहे. बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला एकेरीमध्ये सुवर्णपदकासाठी भारताच्या सायना नेहवाल आणि पी. व्ही. सिंधू यांच्यात आज सामना झाला. यामध्ये सायना नेहवालने आक्रमक खेळी करत दोन्ही सेट जिंकून सुवर्णपदकावर आपले नाव कोरले, तर पी. व्ही. सिंधूला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.आजच्या सामन्यात सायना नेहवालने आक्रमक खेळी करत पी. व्ही. सिंधूचा 21-18, 23-21 असा सरळ दोन सेटमध्ये पराभव केला. या सामन्यात सायना नेहवालला पी. व्ही. सिंधूने सुद्धा कडवी झुंज दिली. दोघींच्या या कामगिरीमुळे सुवर्ण आणि रौप्य अशी दोन्ही पदके भारताच्या खात्यात आली आहेत. त्यामुळे भारताकडे आता 26 सुवर्ण आणि 17 रौप्य पदके आली आहेत.





