32.1 C
Gondiā
Sunday, June 7, 2026
Home विदर्भ आ.रहागंडालेंच्या हस्ते मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचे भूमिपूजन

आ.रहागंडालेंच्या हस्ते मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचे भूमिपूजन

0
19

तिरोडा,दि.१५ : मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत तिरोडा तालुक्यातील मांडवी- सालेबर्डी रस्ता बांधकामाचे भूमिपूजन आज 15 एप्रिलला तिरोडा- गोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार विजयभाऊ रहांगडाले यांचे हस्ते पार पडले.अध्यक्षस्थानी माजी आमदार भजनदासजी वैद्य गुरुजी होते.सदर रस्ता बांधकामासाठी 3 कोटी रुपयाचा निधी मंजूर झालेला आहे.मतदारसंघात मुख्यमंत्री ग्रामसडक योजना,प्रधानमंत्री ग्राम सडक योजना,जलयुक्त शिवार योजनासंह गाळमुक्त धरण आदी योजनासांठी मोठ्याप्रमाणात निधी उपलब्ध असून या विकासकामांमूळे चेहरा मोहरा पालटणार असल्याचे विचार यावेळी आमदार रहागंडाले यांनी व्यक्त केले.भूमिपूजन कार्यक्रमाला तिरोडा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती डॉ. चिंतामण रहांगडाले, प. स.सदस्य डाँ. बी. एस. रहांगडाले,भाजप तालुकाध्यक्ष भाऊराव कठाणे,ग्रा. प.सालेबर्डीचे सरपंच विनोद लिल्हारे, घाटकूरोडाचे सरपंच प्रकाश भोंगाडे, चांदोरी बु. चे उपसरपंच जयसिंग उपासे,मांडवीच्या सारपंचा वनिता नागपुरे, बेलाटीचे सरपंच डोलूराम पारधी, मुंडीपार सरपंच वासुदेव हरिनखेडे,भाजप दलित आघाडीचे महामंत्री धीरज बरियेकर, कार्यकर्ता शिवलाल परिहार, व संबंधित यंत्रणेचे तांत्रिक कर्मचारी उपस्थित होते

blank