38.8 C
Gondiā
Monday, June 8, 2026
Home Top News ई-फेरफारमध्ये अकोला जिल्हा राज्यात अव्वल

ई-फेरफारमध्ये अकोला जिल्हा राज्यात अव्वल

0
16

अकोला – ई-फेरफार नोंदणीत अकोला जिल्ह्याने राज्यात प्रथम येण्याचा बहुमान मिळविला. जिल्ह्यातील सर्व महसूल अधिकारी आणि तलाठी यांच्या मदतीने हे यश काबीज करता आल्याची माहिती बुधवारी अकोल्याचे जिल्हाधिकारी अरुण शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली. या वेळी जिल्हाधिकारी कार्यालयात ई-फेरफारचे ऑनलाइन प्रात्यक्षिकही दाखविण्यात आले. महसूल अधिकारी देशमुख, केंद्रीय माहिती अधिकारी अनिल चिंचोली पत्रकार परिषदेत उपस्थित होते.

अकोला जिल्ह्यातील सात तालुक्‍यांतील 1009 गावे आणि जिल्ह्यातील 5428 चौरस किलोमीटरचा परिसर ई-फेरफार अपलोड झाला आहे. जिल्ह्यातील तेल्हारा तालुका 1 ऑगस्ट 14 पासून आणि उर्वरित 6 तालुक्‍यात 13 फेब्रुवारी 15 पासून ई-फेरफार कार्यक्रम सुरू झाला. यापूर्वी तेल्हारा तालुक्‍याने पायलट प्रकल्पात विभागात नाव मिळविले होते. विभागीय आयुक्तांनी याची दखल घेत तेल्हाऱ्यास भेट दिली होती. त्यानंतर हा प्रकल्प जिल्ह्यात राबविला गेला.
ऑनलाइन प्रक्रियेमुळे तलाठ्यांचे काम कमी झाले असून, मंडळ अधिकाऱ्यांना पंधरा दिवसांत शेती आणि खरेदी-विक्रीच्या नोंदी अपलोड करणे बंधनकारक आहे. यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी अकोल्यातील 330 अधिकाऱ्यांना लॅपटॉप, डोंगल देऊन अद्ययावत प्रशिक्षण दिले. यासाठी महसूल यंत्रणेला दोन वर्षांचा काळ लागला. पत्रकार परिषदेत ऑनलाइन फेरफार आज्ञावलीत कार्यान्वित तारखेसह माहिती देण्यात आली. यामध्ये अमरावतीसह, औरंगाबाद, कोकण, नाशिक, पुणे, नागपूर विभागाची माहिती देण्यात आली

blank