
देवरी,दि.21 : तालुक्यात महादुष्काळ पडला असूनसुद्धा शासनाने येथील शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारची आर्थिक मदत केलेली नाही. अशा परिस्थितीतही आदिवासी समाजातील लोकांनी पुढाकार घेऊन सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन केले. ही अतिशय अभिमानाची बाब आहे. अशा सामूहिक विवाह सोहळ्याच्या माध्यमातून समाजातील लोक एकत्र होतात. अशा सोहळ्यांमुळे लोकांची आर्थिक बचत, वेळेची बचत व एकत्रीकरण होते. सामाजिक बांधिलकीच्या दृष्टीकोनातून असे सामूहिक विवाह सोहळे काळाची गरज आहे, असे प्रतिपादन माजी खासदार नाना पटोले यांनी केले.
ते आदिवासी हलबा-हलबी समाज सामूहिक विवाह समितीच्यावतीने रविवारी (दि.१५) आदिवासी समाजाच्या २७ जोडप्यांचा सामूहिक विवाह सोहळा क्रांतीवीर बिरसा शक्ती मैदानात पार पडला. या वेळी उद्घाटक म्हणून ते बोलत होते.अध्यक्षस्थानी आ. संजय पुराम होते. याप्रसंगी प्रामुख्याने माजी आ. रामरतन राऊत, माजी महिला व बालकल्याण सभापती सविता पुराम, डॉ. नामदेवराव किरसान, सालेकसाचे माजी सभापती हिरालाल फाफनवाडे, माजी समाजकल्याण सभापती देवराज वडगये, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रमेश ताराम, आदिवासी विकास महामंडळाचे संचालक भरतसिंग दुधनाग, नगरसेवक यादोराव पंचमवार, जि.प. सदस्य उषा शहारे आणि बी.टी. राऊत यांच्यासह समाजातील प्रतिष्ठित नागरिक, महिला, पुरुष, युवक वर्ग व वºहाडी हजारोंच्या संख्येत उपस्थित होते.
या विवाह सोहळ्यात लग्न करणाºया आदिवासी समाजाच्या २७ वर-वधू जोडप्यांचा विवाह समिती तथा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते भेटवस्तू व भावी वैवाहिक सुखी जीवनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. दरम्यान आ. संजय पुराम, माजी आ . रामरतन राऊत, डॉ. नामदेवराव किरसान, रमेश ताराम, भरतसिंग दुधनाग, उषा शहारे व बी.टी. राऊत आदींनी मार्गदर्शन केले.प्रास्ताविक आदिवासी समाज सामूहिक विवाह समितीचे अध्यक्ष हिरालाल भोई यांनी मांडले. संचालन करून आभार सविता उईके यांनी मानले.





