38.8 C
Gondiā
Monday, June 8, 2026
Home गुन्हेवार्ता मद्यधुंद झायलोचालकाने घेतला पोलिसांचा बळी

मद्यधुंद झायलोचालकाने घेतला पोलिसांचा बळी

0
19

नागपूर,दि.23 : मद्यधुंद झायलो चालकाने जोरदार धडक दिल्यामुळे कर्तव्यावर असलेल्या एका पोलीस शिपायाचा करुण अंत झाला. तर दुसरा पोलीस शिपायी गंभीर जखमी आहे.वाडी ठाण्याच्या हद्दीत रविवारी मध्यरात्री हा भीषण अपघात घडला.
प्रदीप गणपतराव उईके (वय ३४) असे मृताचे तर अजय प्रभाकर पाटील (वय ४२) असे जखमी पोलिसाचे नाव आहे. हे दोघे वाडी पोलीस ठाण्यात कार्यरत होते. रविवारी त्यांची नाईट ड्युटी होती. रात्री १२. ३० च्या सुमारास ते कर्तव्यावर होते. दुचाकीने प्रदीप आणि अजयआठवा मैलकडे गस्त करीत असताना मागून वेगात आलेल्या झायलो (एमएच ३१/ सीएस १८५३) चा आरोपी चालक हर्षदीपसिंग देवेंद्रसिंग आनंद (वय ३६, रा. शिवाजीनगर, हर्षविला, अंबाझरी) याने प्रदीप व अजयच्या दुचाकीला जोरदार धडक मारली. त्यामुळे खाली पडून दोघेही गंभीर जखमी झाले. त्यांना डॉक्टरकडे नेले असता डॉक्टरांनी प्रदीप ऊईके यांना मृत घोषित केले.

blank