23.2 C
Gondiā
Thursday, August 20, 2026
Home विदर्भ डोंगरगाव ग्रामपंचायतीच्यावतीने उज्वला गॅसचे वितरण

डोंगरगाव ग्रामपंचायतीच्यावतीने उज्वला गॅसचे वितरण

0
23

सडक अर्जुनी,दि.17 :- तालुक्यातील डोंगरगाव  ग्रामपंचायत कार्यालयात आज उज्वला योजनेतर्गत  गावातील दारिद्ररेषेखालील 68 लाभार्थांना गँसचे वाटप  करण्यात आले.ग्राम पंचायत डोंगरगावचे सरपंच दिनेश हुकरे यांच्या  हस्ते गँसचे वाटप करण्यात आले.यावेळी ग्राम पंचायत सदस्य कविताताई कोरे, पुष्पाताई खोटेले, संजय डोये, सावजी हुकरे यांच्यासह गावातील गणमान्य नागरिक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.यामध्ये गावातील 68 लाभार्थ्यांना याचा लाभ मिळाला आहे.चुलीच्या धुरापासून होणाऱ्या त्रासाला लक्षात घेत ही योजना राबविण्यात येत आहे.