36.6 C
Gondiā
Monday, June 8, 2026
Home Top News आपले मुख्यमंत्री पळपुटे – अजित पवार

आपले मुख्यमंत्री पळपुटे – अजित पवार

0
19

blank

पिंपरी – कॉम्रेड गोविंद पानसरे यांची कोल्हापूरमध्ये झालेली हत्या आणि त्यांचे मारेकरी शोधण्यात आलेले अपयश म्हणजे राज्यातील कायदा व सुव्यवस्थेचा उडालेला फज्जा आहे. या घटनेचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना गांभीर्य नाही. कुशलतेने तपास यंत्रणा कामाला लावायचे सोडून, ही घटना म्हणजे “सिस्टिम‘चा दोष असल्याचे त्यांनी केलेले विधान संताप आणणारे आहे. आपले अपयश दडविण्यासाठी यंत्रणेवर आरोप करणे म्हणजे अपयशापासून पळ काढण्यासारखे आहे. त्याचा आपणास खेद वाटतो, अशा शब्दांत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांनी केलेल्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला.

पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध विकासकामांची माहिती देण्यासाठी तसेच स्थायी समितीच्या नियोजित सदस्य निवडीसंदर्भात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पदाधिकारी, नगरसेवकांची बैठक पवार यांच्या उपस्थितीत झाली. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी विविध विषयांवर आपली भूमिका मांडली. ते म्हणाले, “”सुमारे दीड वर्षापूर्वी पुण्यात “अंनिस‘चे प्रमुख नरेंद्र दाभोलकर यांची पुण्यात हत्या झाली. त्याचा तपास अद्याप लागलेला नाही. त्याच पद्धतीने कोल्हापुरात कॉम्रेड गोविंद पानसरे यांची हत्या झाली. राज्याला पुरोगामी विचार देणारी सोन्यासारखी माणसे संपविली जात असताना मुख्यमंत्र्यांना त्याचे गांभीर्य नाही. हत्या होऊन आठ दिवस झाले, तरी मारेकऱ्यांचा अद्याप सुगावा लागलेला नाही. या तपासाकडे लक्ष्य केंद्रित करण्याऐवजी मुख्यमंत्री यंत्रणेला दोष देत असतील, तर ती त्यांची पळपुटी भूमिका आहे. फडणवीस मुख्यमंत्री आहेत शिवाय त्यांच्याकडेच गृह खाते आहे. अशा वेळी आर. आर. पाटील यांची आठवण होते. अशा घटना घडल्यानंतर ते स्वत: लक्ष घालून यंत्रणा हलवून सोडत असत. अधिकाऱ्यांच्या मागे लागत. येथे मात्र मुख्यमंत्री आपली जबाबदारी झटकत आहेत. त्याची चीड येते.‘‘

blank