33.9 C
Gondiā
Monday, June 8, 2026
Home Top News नाशिक महापालिकेसमोर सापडला बॉम्ब

नाशिक महापालिकेसमोर सापडला बॉम्ब

0
21

blank

वृत्तसंस्था
नाशिक – महापालिकेच्या समोर बिल्डर अनंत राजेगावकर यांच्या कार्यालयाजवळ गावठी बॉम्ब आढळल्याने खळबळ उडाली होती पण बॉम्बशोधक पथकाला हा बॉम्ब निकामी करण्यात यश आले असून या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली असून नाशिक हे दहशतवाद्यांच्या लिस्टवर असल्याचे पुन्हा सिद्ध झाले आहे.

या प्रकाराची माहिती मिळाताच घटनास्थळी पोलीस आणि बॉम्ब शोधक आणि नाशक पथकाने (बीडीडीएस) धाव घेतल्यानंतर तातडीने बॉम्ब निकामी करण्यात आला. अनंत राजेगावकर हे व्यवसायाने बिल्डर असून ते सुयोजित या कंपनीचे मालक आहेत. दरम्यान हा क्रूड ऑईल पेट्रोल बॉम्ब होता, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. या घटनेनंतर संबधित व्यावसायिकाच्या कार्यालयासह महापालिकेच्या सुरक्षाव्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे.

blank