40.1 C
Gondiā
Wednesday, June 17, 2026
Home विदर्भ गंगाझरी पोलीस ठाण्यात वृक्षारोपण

गंगाझरी पोलीस ठाण्यात वृक्षारोपण

0
36

गोंदिया,दि.09ः- सामाजिक वनीकरण च्या माध्यमातून पोलीस स्टेशन गंगाझरी परिसरात पर्यावरणाची समस्या लक्षात घेऊन वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आले.या वृक्षारोपन कार्यक्रमाप्रसंगी आपल्या परिसरात  जास्तीत जास्त वृक्षारोपण करणे आवश्यक असून वृक्षारोपणाचे महत्व गोंदिया जिल्हा परिषदेचे शिक्षण व आरोग्य सभापती रमेश अंबुले यांनी पटवून दिले.या कार्यक्रमाला पं. स.सदस्य प्रकाश पटले, कु .एस. डुंबरे R.F.O. सामाजिक वनीकरण गोंदिया,पोलीस निरिक्षक शितल जाधव,पोलीस पाटील  हिवराज ताजने दांडेगाव, व इतर सर्व पोलीस पाटील आणि कर्मचारी उपस्थित होते.