अत्याधुनिक उपकेंद्राच्या इमारतीतून उत्तम आरोग्य सेवा देण्याचा प्रयत्न – पालकमंत्री बडोले

0
13

अजुर्नी मोरगाव(संतोष रोकडे) ,दि.09ः-आदिवासी नक्षल प्रभवित अशा अति दुर्गम भागात उत्तम दजार्ची आरोग्य सेवा पुरविण्याचा आमचा प्रयत्न आहेत्र गोंदिया जिल्ह्यात आमच्या शासनाने अत्याधुनिक २९ उपकेंद्राच्या दिमाखदार इमारती तयार केल्या असून २ उपकेंद्र इमारतीचे बांधकाम पूर्ण होवून त्या जनतेच्या सेवेसाठी कार्यरत आहेत. तर नऊ इमारतींचे बांधकाम प्रगतीपथवर आहे. आयुषच्या माध्यमातून प्रत्येक उपकेंद्रात येणार्?या काळात एक बी.ए.एम.एस.डॉक्टराची नियुक्ती करण्याचा मानस आहे. सध्या आरोग्य कर्मचार्?यांची मोठ्या प्रमाणात वाणवा आहे, ११ जुलै रोजी मुख्यमंत्री यांच्यासोबत आरोग्य कर्मचार्?यांच्या पदभरती संदर्भात बैठक घेण्यात येणार असून त्यासंदर्भात आपण यावर चर्चा करून तोडगा काढणार, अशी प्रतिपादन राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केले.
अजुर्नी मोरगाव तालुक्यातील वडेगाव बंध्या, येगांव व अरूणनगर येथील अत्याधुनिक आरोग्य उपकेंद्र इमारतीच्या लोकार्पण प्रसंगी उद्घाटक म्हणून पालकमंत्री बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जि.प.अध्यक्षा सिमाताई मडावी होत्या. प्रमुख अतिथी म्हणून महिला व बालकल्याण सभापती लताताई दोोडे, समाज कल्याण सभापती विश्‍वजीत डोंगरे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.राजा दयानिधी, जि.प.सदस्य तेजुकला गहाणे, मंदा कुंभरे, सभापती अरविंद शिवणकर, गटविकास अधिकारी नारायणप्रसाद जमईवार, जिल्हा आरोग्य अधिकारी एस.डी.निमगडे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.विजय राऊत, पं.स.सदस्य रामलाल मुंगणकर, अर्चना राऊत, रघुनाथ लांजेवार, केवळराम पुस्तोडे, प्रकाश गहाणे, हरीश्‍चंद्र ऊईके, प्रदिप मस्के, सरपंच ृमृणाल झोळे, यशवंत गणवीर, विनोद नाकाडे, व्यंकट खोब्रागडे, नुतन सोनवाने, संदिप कापगते, भोजु लोगडे तथा विविध गावातील सरपंच प्रामुख्याने उपस्थित होते.