
गोंदिया, दि. ९ – सडक अर्जुनी तालुक्यातील सौंदड येथील ग्रामीण रूग्णालय परिसरातील औषधी भांडार व शवविच्छेदन गृहाच्या बांधकाम कार्याचे भूमीपुजन पालकमंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते झाले.अध्यक्षस्थानी सडक अर्जुनीचे पंचायत समिती सभापती गिरीधारी हत्तीमारे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून गोंदिया जिल्हा परिषद सदस्य रमेश चु-हे, सडक अर्जुनी पंचायत समिती उपसभापती राजेश कठाणे, सदस्या मंजु डोंगरवार, सौंदड ग्रामपंचायतचे सरपंच गायत्री इरले, कविता रंगारी उपस्थित होते.
औषध भांडार गृहाचे बांधकाम १४१.७५ चौ. मीटर क्षेत्रात करण्यात येणार आहे. तसेच शवविच्छेदन गृहाचे बांधकाम ७२ चौ. मीटर क्षेत्रात होणार आहे. यासह ग्रामीण रूग्णालय परिसरातील अंतर्गत रस्ते व नालीचे बांधकाम करण्यात येणार आहे.





