41.6 C
Gondiā
Thursday, June 4, 2026
Home Top News मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील गाडीच्या धडकेत १ ठार

मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील गाडीच्या धडकेत १ ठार

0
29

करनाल – हरियानाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांच्या ताफ्यातील गाडीने सोमवारी रात्री पादचाऱ्याला ठोकरल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

पोलिस अधीक्षक अभिषेक गर्ग यांनी दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रीय महामार्ग-१ वर हा अपघात झाला असून, या अपघातात पादचारी व्यक्ती ठार झाला आहे. त्याची अद्याप ओळख पटलेली नाही. या अपघातात धडक दिलेल्या गाडीतील दोन पोलिस कर्मचाऱ्यांना दुखापत झाली आहे. पादचारी व्यक्ती रस्ता क्रॉस करण्याचा प्रयत्न करत असताना, मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील एका मोटारीने त्याला धडक दिली.

करनालपासून २० किमी अंतरावर तारौरी येथे हा अपघात झाला. मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर आपल्या ताफ्यासह चंडीगढहून दिल्लीला निघाले होते. अपघातानंतर पादचारी व्यक्तीला शासकीय रुग्णालयात नेण्यात आले. पण, तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता.

blank