‘आरएसएस’ म्हणजे अविवाहितांचा क्लब- ओवैसी

0
4

वृत्तसंस्था
हैदराबाद – राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) अविवाहितांचा क्लब असून, त्यांनी आम्हाला मुलांना जन्माला कसे घालावे हे शिकवू नये, अशी जहरी टीका एमआयएमचे आमदार अकबरुद्दीन ओवैसी यांनी केली आहे.

हैदराबादमध्ये सोमवारी एमआयएम पक्षाच्या ५७ व्या स्थापनादिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात ओवैसी यांनी आरएसएसला लक्ष्य करत त्यांच्यावर जोरदार टीका केली.

ओवैसी म्हणाले, ‘‘संघाचे नेते प्रत्येकाने जास्तीत जास्त मुलांना जन्माला घालण्याचा सल्ला देत आहेत. पण, ते स्वतःच विवाहीत नसल्याने त्यांनी आम्हाला मुलांना जन्माला घालण्याबाबत शिकवू नये. आरएसएसचे प्रचारक लग्न करत नाहीत. त्यामुळे त्यांची ओळख आरएसएस अशी नसनू, अविवाहितांची टोळी आहे. लग्न करून ते जबाबदारी स्वीकारण्यास तयार नसतात, त्यांना दररोजच्या जगण्यातील आव्हाने माहित नसतात, पत्नी आणि मुलांच्या जबाबादीरीची जाणीव त्यांना नसते. अन् दुसऱ्यांना चार मुलांना जन्माला घालण्याचा सल्ला देत फिरत आहेत. प्रत्येक कुटुंब ४ ऐवजी १२ किंवा १४ मुलांना जन्माला घालण्यास तयार आहे. पण, त्यांना शिक्षण, नोकरी, घर आणि इतर सुविधा तुम्ही पुरविणार आहात का? सर्व मुस्लिम नागरिकांनी आपल्या हक्कांसाठी एकत्र येऊन लढले पाहिजे. तसे न झाल्यास मुस्लिमांचे अस्तित्व धोक्यात येण्याची शक्यता आहे.‘‘