40.6 C
Gondiā
Sunday, June 7, 2026
Home Top News पोलिसांच्या लाठीहल्ल्यात सचिन पायलट जखमी

पोलिसांच्या लाठीहल्ल्यात सचिन पायलट जखमी

0
24

blank

वृत्तसंस्था
जयपूर – भूसंपादन अध्यादेशाविरोधात विधानसभेबाहेर प्रदेशाध्यक्ष सचिन पायलट यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी आंदोलन करणाऱ्या काँग्रेस कार्यकर्त्यांवर पोलिसांनी केलेल्या लाठीहल्ल्यात सचिन पायलट जखमी झाले आहेत.

राजस्थान विधानसभेत अर्थसंकल्पीय अधिवेशनात सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पाला आणि काँग्रेस कार्यकर्त्यांवर झालेल्या लाठीहल्ल्याबद्दल सभागृहात निषेध व्यक्त करणाऱ्या काँग्रेसच्या आठ आमदारांना निलंबित करण्यात आले आहे. काँग्रेस कार्यकर्ते पायलट यांच्या नेतृत्वाखाली विधानसभेला घेराव घालण्याच्या प्रयत्नात असताना पोलिसांनी लाठीमार केला. यामध्ये पायलट यांच्यासह 30 कार्यकर्ते जखमी झाले आहेत. भूसंपादन अध्यादेश शेतकरी विरोधात असल्याच्या घोषणा देत सरकारविरोधात निदर्शने करण्यात आली.

blank