
यूएईविरुद्धच्या सामन्यात पाकिस्तान संघाने प्रथम फलंदाजी करत ३४० धावांचा डोंगर उभारला आहे. गेल्या तीन सामन्यांमध्ये सूर हरवलेल्या अहमद शेहजादने यावेळी दमदार पुनरागमन करून ९३ धावा ठोकल्या तर, हॅरिस सोहेलसुद्धा चांगल्या फॉर्मात पाहायला मिळाला. सोहेलने ७० धावांची खेळी केली. कर्णधार मिसबाहने ४९ चेंडूत ६५ धावांची ठोकून संघाच्या धावसंख्येला तीनशेच्या पार नेण्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले. अखेरच्या षटकांत शाहिद आफ्रिदीने अवघ्या ७ चेंडूत नाबाद २१ धावा काढून संघाच्या धावसंख्येला आणखी मजबूत केले. यूएईकडून मंजुला गुरुगेयाने चार विकेट्स मिळवल्या तर, मोहम्मद नावेदच्या पदरात केवळ एका विकेट मिळाली.




