23.9 C
Gondiā
Monday, August 17, 2026
Home विदर्भ आमदार चरण वाघमारे यांच्या हस्ते गॅस कनेक्शनचे वाटप

आमदार चरण वाघमारे यांच्या हस्ते गॅस कनेक्शनचे वाटप

0
41
मोहाडी(नितिन लिल्हारे),दि.02: मोहाडी तालुक्यातील धोप येथील  ग्रामपंचायत कार्यालयात  गावातील गरजू लाभार्थ्यांना प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजनेअंतर्गत ४५ गॅस कनेक्शनचे वाटप आमदार चरण वाघमारे यांच्या हस्ते करण्यात आले. ग्रामपंचायत सभागृहात आयोजित गॅस कनेक्शन वितरण समारंभाप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य मंजुषा गभणे, पंचायत समिती सदस्य किरण भैरम, सरपंच खोब्रागडे, उपसरपंच ओमकार मोहतुरे, जगदीश शेंडे, सर्व ग्रा. प. सदस्य व भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.
गॅस वितरण प्रसंगी उपस्थित गावकऱ्यांना मार्गदर्शन करताना आमदार चरण वाघमारे यांनी, शासनाच्या लोकोपयोगी योजनांचा लाभ जास्तीतजास्त गावकऱ्यांना व्हावा या हेतुने शासनाच्या वतीने शर्थीचे प्रयत्न केल्या जात आहे, तळागाळातील लोकांपर्यंत योजना पोहचावी हे शासनाचे उद्देश आहे, भाजप सरकारच्या काळात विकासाची गंगा वाहत आहे, सर्व सामान्य नागरिक सरकारच्या कामकाज पाहून आनंदी आहे, विरोधक सर्वसामान्य माणसाची दिशाभुल करीत आहे, तुमसर मोहाडी तालुक्याकरिता निधी कमी पडू देणार नाही अशी ग्वाही गॅस कनेक्शनचे वाटपाच्या कार्यक्रमात दिली.
गॅस वितरक यांनी, गॅस पेटविण्याच्या तंत्राबद्दल विस्तृत माहिती दिली. याप्रसंगी ४५ लाभार्थ्यांना गॅस कनेक्शनचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमासाठी गॅस वितरक एजन्सी तसेच ग्रामपंचायतचे कर्मचारी व गावातील महिला व पुरुष मंडळी यांनी सहकार्य केले