
मुंबई- महाराष्ट्रातील आम आदमी पक्षाच्या नेत्या अंजली दमानिया यांनी पक्षाला पुन्हा सोडचिठ्ठी दिली आहे. दमानिया यांनी टिे्वटवर ही माहिती दिली आहे. मी पक्ष सोडत आहे. मी आपमध्ये असले घाणेरडा खेळ खेळण्यासाठी आले नव्हते. मी अरविंद केजरीवाल यांच्या तत्वांना पाठिंबा दिला होता त्यांच्या घोडेबाजाराला दिला नव्हता असे दमानिया यांनी टि्वट केले आहे.
दिल्लीतील आमचे माजी आमदार राहिलेल्या राजेश गर्ग यांनी केजरीवालांवर गंभीर आरोप करीत एक टेप जारी केली आहे. या टेपमध्ये केजरीवाल हे काँग्रेसचे आठ आमदार फोडण्याच्या तयारीत होते व त्यासाठी त्यांनी घोडेबाजार केल्याचे टेपमधील संभाषणावरून स्पष्ट होत आहे. गेल्या वर्षी नोव्हेबर महिन्यांत दिल्लीत राष्ट्रपती राजवट असताना केजरीवाल यांनी काँग्रेसचे सर्व आठ आमदारांना पक्षातून बाहेर पडण्यासाठी घोडेबाजारात गुंतले होते. मात्र, दोन आमदारांनी नकार दिल्यानंतर सहा आमदारांनी बाहेर पडून वेगळा गट स्थापन करून आपला पाठिंबा देण्यास भाग पाडावे असे संभाषण अरविंद केजरीवाल हे राजेश गर्ग यांच्याशी करताना दिसून येत आहेत. मात्र, ही टेप खरी आहे की खोटी ते अद्याप स्पष्ट झाले नाही. मात्र, त्यापूर्वीच अंजली दमानिया यांनी राजेश गर्ग यांचे आरोप खरे मानत पक्षाला रामराम ठोकला आहे. कारण दमानिया यांनी टि्वटसोबत इंडिया टीव्हीने सादर केलेला टेप जोडला आहे





