24.7 C
Gondiā
Tuesday, August 18, 2026
Home विदर्भ वसंतराव नाईक अधिकारी/कर्मचारी संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी प्रा.डा.राठोड

वसंतराव नाईक अधिकारी/कर्मचारी संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी प्रा.डा.राठोड

0
79

गोंदिया,दि.27ः- येथील ग्रीनलॅंड सभागृहात पार पडलेल्या सभेत  वंसतराव नाईक अधिकारी व कर्मचारी संघटना(ट्रेड युनियन) जिल्हा शाखा गोंदियाची कार्यकारीणी गठित करण्यात आली.या सभेच्या  अध्यक्षस्थानी अमर राठोड (राष्ट्रीय अध्यक्ष ) होते.तर पाहुणे म्हणून विभागीय संघटक राजुभाऊ चव्हान,श्री.जाधव, मनोज चव्हाण उपस्थित होते. जिल्हाध्यक्षपदी प्रा.बाबुसींग राठोड यांची निवड करण्यात आली.कार्याध्यक्षपदी मयुर राठोड, उपाध्यक्षपदी नरेंद्र राठोड,गणेश पवार,सचिवपदी सुनिल राठोड, कोषाध्यक्ष विलास राठोड, सहसचिव डाॅ.सुनिल जाधव, जिल्हा संघटक प्रदिप राठोड, प्रसिध्दीप्रमुख पृथ्वीराज चव्हाण ,सदस्यामध्ये गुलाब राठोड,सुजित राठोड आणि मार्गदर्शक म्हणून नायब तहसिलदार शिशुपाल पवार व संजय राठाेड यांची निवड करण्यात आली.सभेला ज्ञानेश्वर राठोड,किशोर मुडे, डॉ.सुनिल राठोड,मिथुन चव्हान, आकाश चव्हाण , किशोर राठोड, विठ्ठल राठोड,गुलाब आडे,सुजीत पवार,पृथ्वीराज चव्हाण व समस्त बंजारा समाजातील सदस्य हजर होते.