31.4 C
Gondiā
Thursday, June 4, 2026
Home महाराष्ट्र नवी मुंबई व औरंगाबाद महापालिकेसाठी येत्या 22 एप्रिलला मतदान,

नवी मुंबई व औरंगाबाद महापालिकेसाठी येत्या 22 एप्रिलला मतदान,

0
16

मुंबई- पुढील महिन्यात होऊ घातलेल्या नवी मुंबई व औरंगाबाद महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाच्या अधिका-यांनी आज कार्यक्रम जाहीर केला. त्यानुसार येत्या 22 एप्रिल रोजी दोन्ही महापालिकेसाठी मतदान होईल. तसेच त्याच्या दुस-याच दिवशी मतमोजणी होणार आहे. दरम्यान, या दोन्ही महापालिकांची निवडणूक जाहीर झाल्याने या क्षेत्रात आज मध्यरात्रीपासून आचारसंहिता लागू होईल असेही आयोगाने म्हटले आहे.
औरंगाबाद महानगरपालिकेत सध्या 99 नगरसेवक आहेत. मात्र, यंदा यात 14 ने वाढ झाली आहे. त्यामुळे सध्या औरंगाबाद नगरपालिकेत 99 नगरसेवकांवरून 113 अशी संख्या असेल.सातारा- देवळाई भाग अाता मनपात समविष्ट झाल्याने नगरसेवक संख्या वाढली आहे.