नरेंद्र मोदींना राजू शेट्टींचा घरचा आहेर

0
5

पुणे : पंतप्रधान मोदींनी स्वतः ‘मन की बात’ कार्यक्रमाच्या माध्यमातून आकाशवाणीवरुन भूसंपादन विधेयकातील बदलांच्या अध्यादेशावरून केंद्र सरकारविरोधातील मत बदलण्यासाठी शेतकऱ्यांशी संवाद साधला. पण त्याचा फारसा प्रभाव पडलेला दिसत नसून मोदी सरकारचा मित्रपक्ष असलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेने भूसंपादन विधेयकाविरोधात पदयात्रा काढली.

शेतकऱ्यांच्या जमिनी कायद्याचा बडगा उभारुन लाटण्याचा प्रयत्न केला जातो आहे. जमीन हवी असेल तर बाजारात उतरावे आणि जमिनीचा जो काही बाजारभाव असेल, त्या भावाने जमीन विकत घ्यावी, असे राजू शेट्टी यांनी यावेळी म्हटले. शिवाय मोदींची ‘मन की बात’ फसवी असल्याचे भूसंपादन विधेयकावर म्हणत राजू शेट्टींनी मोदींना घरचा आहेर दिला आहे.

सहा वर्षांपूर्वी शेतकऱ्यांच्या जमीनी पुण्याजवळच्या खेडमध्ये प्रस्तावित सेझसाठी घेण्यात आल्या. पण प्रत्यक्षात अजूनही प्रकल्पाचे काम सुरू न झाल्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या जमीनी परत कराव्यात अशी राजू शेट्टींची मागणी आहे. शिवाय नव्याने येऊ घाततेल्या भूसंपादन विधेयकाचाही राजू शेट्टींनी कडाडून विरोध केला आहे.