26.3 C
Gondiā
Saturday, August 15, 2026
Home विदर्भ पर्यटकांसाठी प्याऊचे उदघाटन

पर्यटकांसाठी प्याऊचे उदघाटन

0
42

नवेगावबांध,दि.04ःः अर्जुनी मोरगाव तालुक्यातील सर्वात मोठे पर्यटनस्थळ असलेल्या नवेगावबांध येथील मुख्य छत्रपती चौकात दरवर्षी प्रमाणे यावर्षीही पर्यटकांसह नागरिकांना उन्हाळ्याच्या दिवसात थंड पिण्याचे  पाणी मिळावे याकरिता धर्माथ प्याऊचे उद्घाटन करण्यात आले.यावेळी जिल्हा परिषद सदस्य व राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष किशोर तरोणे,सरपंच अनिरुध्द शहारे, होमराज पुस्तोडे, रितेश जयस्वाल, रघुनाथ लांजेवार,तलाठी कुंभरे,कालिदास पुस्तोडे, मदण बावनकर, नवल चाडक, शामराव ठाकरे,विवेक बोरकर आदी मान्यवर उपस्थित होते.