38.6 C
Gondiā
Sunday, June 14, 2026
Home राजकीय महिला अत्याचाराच्या विरोधात महिला आमदारांच्या घोषणा

महिला अत्याचाराच्या विरोधात महिला आमदारांच्या घोषणा

0
17

blank

मुंबई-महिलांवरील अत्याचारांच्या घटना वाढतच चालल्या आहेत. येणाऱ्या प्रत्येक दिवशी अशा घटना समोर येत आहेत. या गंभीर प्रकाराकडे सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न सर्वपक्षीय महिला प्रतिनिधींनी आज विधान भवनाच्या आवारात केला. महिलांना संरक्षण द्यावे अशी मागणी करणाऱ्या या सर्वपक्षीय महिला लोकप्रतिनिधींमध्ये राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष विद्या चव्हाण, शिवसेनेच्या नीलम गोऱ्हे यांच्यासह दीपिका चव्हाण, हुस्नबानू खलिफे, दीप्ती चौधरी आदींचाही समावेश होता. पुरुषांनी महिलांच्या सुरक्षिततेसाठी पुढाकार घेण्याचे आवाहनही या वेळी त्यांनी केले.महिला अत्याचारविरोधाचे फलक घेऊन विधानभवनाच्या प्रवेशद्वाराजवळ घोषणा देत सरकारचे लक्ष वेधण्याचे प्रयत्न केले.