33.7 C
Gondiā
Thursday, June 4, 2026
Home Top News नक्षल्यांनी केली एटापल्लीत एकाची हत्या

नक्षल्यांनी केली एटापल्लीत एकाची हत्या

0
40

गडचिरोली,दि..६:  जिल्ह्यातील आदिवासी नक्षलग्रस्त एटापल्ली तालुक्यात पोलीस खबऱ्या असल्याच्या संशयावरुन नक्षल्यांनी एका इसमाची हत्या केल्याची घटना आज सकाळी गट्टा(जांभिया) गावानजीक उघडकीस आली. शिरीष मंडल(४१) असे मृत इसमाचे नाव आहे.आज सकाळी गट्टा-बांडे मार्गावर शिरीष मंडल याचा मृतदेह आढळून आला. नक्षल्यांनी त्याची गोळ्या घालून हत्या केली. तो मोटारसायकल मेकॅनिक होता. बंगाली भाषिक नागरिकाची नक्षल्यांकडून हत्या होण्याची गेल्या २० वर्षांतील ही पहिलीच घटना आहे.शिवाय गेल्या दोन दिवसांतील ही दुसरी हत्या आहे. कालच भामरागड तालुक्यातील मर्दहून येथे नक्षल्यांनी डुंगा वेळदा नामक इसमाची गळा चिरुन हत्या केली होती. या घटनेमुळे दुर्गम भागात दहशत निर्माण झाली आहे.

blank