मोर्शीच्या वर्हा आणि काटपुर येथे उसळली महाश्रमदानाची लाट

0
15
 मोर्शी,दि..६: – पाणी फाउंडेशन अंतर्गत सुरू असलेल्या सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा २०१९ मध्ये तालुक्यातील विविध गावांनी भाग घेतले. नुकत्याच झालेल्या १ मे रोजी भिवकुंडी येथे पाणी फाउंडेशन अंतर्गत महाश्रमदानाचे आयोजन केले गेले होते.  (५ मे) रोजी तालुक्यातील वर्हा (उदखेड) आणि काटपुर ह्या ठिकाणी महाश्रमदानाचे आयोजन करण्यात आले होते. वर्हा येथे सकाळी ६.३० वाजता गावात *जलदिंडी* काढत गावकर्यांना एकत्र करत श्रमदानाच्या ठिकाणी नेण्यात आले. श्रमदानाला गावकर्यांनी भरघोस प्रतिसाद दिला, तसेच उदखेड, भिलापूर, पारडी, दाभेरी ह्या ठिकाणाहून जलमित्रांनी श्रमदानात सहभाग नोंदविला. श्रमदानात ढाळीचे बांध हे उपचार घेऊन पाणलोट विकासाचे धडे गावकर्यांना देण्यात आले.आमदार अनिल बोंडे यांनी सुद्धा सक्रिय सहभाग नोंदविला. तसेच गट विकास अधिकारी हे सुद्धा आपल्या चमू सोबत येऊन श्रमदानात सहभागी झाले. आमदार बोंडे यांनी पाणी फाउंडेशनच्या कार्यासाठी आर्थिक मदत केली.
दुसरीकडे काटपुर येथे महाश्रमदानाची सुरुवात एक आगळ्या वेगळ्या प्रकारे करन्यात आली. श्रमदानाच्या सुरुवातीला कुदळ आणि फावडे ह्यांचा सुभाविवाह सोहळा संपन्न करण्यात आले. वराती, ढोल ताशे, मंगलाष्टके अशी सर्व प्रकारच्या परंपरा पूर्ण करत कुदळ संग फावडे ह्यांचा विवाह संपन्न झाला. ह्यासाठी एक दिवसाधी गावातील प्रत्येक घरी आमंत्रण सुद्धा देण्यात आले होते. ह्या लग्नात चक्क वराती म्हणून गावकरी, पंचकृषितील मंडळी, आमदार ऍड. यशोमती ठाकूर, खासदार आनंदराव अडसूड, शिवसेना जिल्हाध्यक्ष यांनी सुद्धा उपस्थिती दर्शवली. आमदार खासदार ह्या सर्व मंडळींनी ह्या आगळ्यावेगळ्या लग्नाची  गोष्ट बघून भारावून गेले .मशीन कामासाठी येणाऱ्या मंडळींनी आर्थिक मदत केल्याने पुढची वाट सोपी होणार अशी भावना गावकर्यांनी व्यक्त केली. श्रमदानातून ढालीचे बांध, सीसीटी, दगडी बंधारे ह्या सारखे उपचार घेण्यात आले.  श्रमदानाला आलेली जलमित्रांचे सत्कार करत कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. पाणी फाउंडेशन मोर्शीची संपूर्ण चमू वर्हा आणि काटपुर येथे उपस्थित राहून तांत्रिक साहाय्य केले.