40.7 C
Gondiā
Friday, June 5, 2026
Home विदर्भ तत्कालीन अन्न पुरवठा मंत्र्यांवर कारवाई व्हावी

तत्कालीन अन्न पुरवठा मंत्र्यांवर कारवाई व्हावी

0
23

blank

नाना पटोले : धान भरडाईत पाचशे कोटीरुपयांवर गैरव्यवहार; मुख्त्र्यांना भेटणार
गोंदिया दि.1- : धानाचे कोठार म्हणून ओळखण्यात येणाèया गोंदिया जिल्ह्यात २००९ ते २०१३ दरम्यान धान भरडाईत पाचशे कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेचा गैरव्यवहार झाला. व्यापाèयांनी भरडाईकरिता नेलेले धान अद्याप शासनाला परत केले नाही. धान देताना त्यांच्याकडून अनामत रक्कम देखील घेण्यात आली नाही. या प्रकारामुळे शेतकèयांच्या धानाला योग्य भाव मिळत नाही. या प्रकरणी तत्कालीन अन्न व नागरी पुरवठा मंत्री अनिल देशमुख यांना दोषी धरून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी खासदार नाना पटोले यांनी केली. यासंदर्भात येत्या सात तारखेला ‘मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचेही ते म्हणाले.
येथील शासकीय विश्रामगृहात पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही महिती आज (ता. १) दिली. नाना पटोले पुढे म्हणाले, शासनाने खरेदी केलेले धान भरडाईकरिता व्यापाèयांना देण्यात येते. धान देताना व्यापाèयांकडून अनामत रक्कम घेणे गरजेचे होते. परंतु, तत्कालीन शासनाने ती प्रक्रीया पार न पाडता कमीशन घेऊन धान भरडाईकरिता दिले. ट्रांसपोर्टची रक्कम देखील देण्यात आली. पाच वर्षांपासून भरडाई करून व्यापाèयांनी शासनाला धान दिले नाही. याप्रकरणी सरकार एवढेच दोषी अधिकारी देखील आहेत. या प्रकरणाची संपूर्ण शहानिशा करून दोषी असलेल्या तत्कालीन सरकारातील अन्न व नागरी पुरवठा मंत्र्यांविरोधात कारवाई होणे गरजेचे आहे. त्याकरिता केंद्रीय‘मंत्री रामविलास पासवान यांची भेट घेतली. आता मुख्यमंत्री फडणवीस यांना भेटून कारवाईची मागणी रेटून धरण्यात येईल. खासदार झाल्यानंतर जिल्ह्याकरिता काय केले, यासंदर्भात बोलताना ते म्हणाले, गोंदिया-जबलपूर या रेल्वेमार्गाचे अडथडे दूर झाले असून त्याकरिता पाचशे कोटी रुपयांचा निधी आणला. राष्ट्रीय महामार्गाला मंजुरी मिळाली. रेल्वे आणि राष्ट्रीय महामर्गाच्या माध्यमातून गोंदियाला महत्व प्राप्त होणार आहे. शेतकèयांच्या हिताकरिता शेतकरी सुरक्षा आयोग स्थापन करण्याकरिता लोकसभेच्या अधिवेशनात मागणी केली. त्यासंदर्भात शासन सकारात्कम असून त्याचे परिणाम लवकरच पुढे येणार आहेत. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शेतकèयांना हजार रुपयांचे कर्ज दिल्यावर त्याच रकमेतून शंभर रुपये ठेव म्हणून कपात करतो. ते शंभर रुपये बँकेकडे असतात. परंतु, व्याज हजार रुपये घेतले जाते. यातून शेतकरी आत्महत्या वाढत आहेत. हा प्रकार बंद करण्याकरिता महाराष्ट्र शासनाकडे पत्रव्यवहार केला. गोंदिया शहराच्या विकासासंदर्भात बोलताना नाना पटोले म्हणाले, मी या विषयाला घेऊन गंभीर आहे. परंतु, येथील लोकप्रतिनिधींची अनास्था आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात पालिकेचे अध्यक्ष आणि मुख्याधिकारी यांना पाचारण केले होते. बैठकीला मुख्याधिकारी हजर होते. परंतु, नगराध्यक्ष अनुपस्थित होते. शहराच्या विकासाकरिता स्थानिक पुढारीच इच्छुक नसल्याने शहर बकाल होत आहे. शहर विस्तारिकरणाची अद्याप योजना आखण्यात आली नाही. मे, जून आणि जुलै या महिन्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होणार आहे. ‘मठवाड्यासारखी स्थिती गोंदिया जिल्ह्यात येणार आहे. परंतु, संबंधीत विभागाने त्याकडे अद्याप लक्ष दिले नसल्याचेही पटोले म्हणाले. यावेळी भरत क्षत्रीय, दिनेश दादरीवाल, नंदू बिसेन, दीपक कदम, राजेश चतुर, घनशाम पानतवने, बंटी पंचबुद्धे,गुड्डू कारडा,हालानी,रेखलाल टेंभरे,चतुभुज बिसेन, दिनेश मिश्रा, अमत झा, सुनिल केलनका, धमद्र डोहरे, छेदिलाल इमलाह, बालू देशमख, अशेक देशमुख, मुकेश हलमारे, कमलेश सोनवाने, राम पुरोहित, सतीश चव्हाण, अमित मिश्रा, गुड्डू लिल्हारे, गुड्डू नेवारे, अरqवद महतो, अनूप शुक्ला, चंद्रभान तरोणे, शालिनी डोंगरे, असीम शेख, अमित बुद्धे, पंकज रहांगडाले, निलम हलमारे, रोशन रहमतकर आदी उपस्थित होते.

blank