40.7 C
Gondiā
Friday, June 5, 2026
Home Top News बारामुल्ला जिल्हयात चकमकीत दोन जवान शहीद

बारामुल्ला जिल्हयात चकमकीत दोन जवान शहीद

0
25

वृत्तसंस्था,
श्रीनगर,दि. २-जम्मू काश्मीरमधील बारामुल्ला जिल्हयातील तांगमार्ग भागात आज गुरुवारी सकाळी सुरक्षा रक्षक व दहशतवाद्यांमध्ये जोरदार गोळीबार झाला. या गोळीबारात दोन भारतीय जवान शहीद झाले असून यात एक नागरिक जखमी झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या भागातील कुंझेर गावात दहशतवादी लपून बसल्याची माहिती जवानांना मिळाली होती. जवानांनी मिळालेल्या माहितीनुसार या परिसरात शोध मोहीम राबविली. या मोहीमेदरम्यान दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात दोन जवान शहीद झाले तर, एक नागरिक जखमी झाला आहे. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या कारवाईदरम्यान दहशतवाद्यांनी जवानांच्या दिशेने अंदाधुंद गोळीबार केला. यावेळी जवानांनीही या गोळीबारास सडेतोड प्रत्युत्तर दिले. या संपूर्ण परिसरात जवानांनी घेराव घातला असून अजुनही याठिकाणी चकमक सुरु आहे.

blank